मुलांनो, आळस झटका, वेळ निघून गेली की, जगणं मुश्कील होतं
---------------------
मुलांनी आळस झटकावा. आळशी होणे म्हणजे माता पित्यालाच नव्हे तर स्वतःलाही धोका देणे आहे. आता हे तरुणांना शिकवण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही तर वेळेचे भान न ठेवल्यास संपूर्ण आयुष्याची राख रांगोळी होऊन भविष्य अंधःकारमय होत जाते. मुलांना हे समजत नाही आणि तोपर्यंत बराच काळ जातो. त्यामुळे तरुणांनी वेळेचे भान ठेवावे. अभ्यासाच्या वेळी अभ्यास आणि कामाच्या वेळी काम करून स्वतःच्या पायावर उभे रहावे. वेळेला महत्व न दिल्यास जीवन जगणही मुश्किल होतं, आणि पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेला महत्व देऊन अभ्यास करावा, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.
'शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे', हे लहानपणी शिकवलं जात असायचं. आताची परिस्थिती पाहिली तर दुधात जशी भेसळ झाली आहे, त्यापेक्षा वाईट परीस्थिती शिक्षणाची झाली आहे. शिक्षणासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात असले, तरी हा खर्च वाया जाताना दिसतो. तरुणांना खरे शिक्षण न देता, संस्था एकीकडे गल्ले भरून घेत आहे. तर दुसरीकडे अनेक ऊनाड मुलं शाळा अन महाविद्यालयात न जाता आई वडिलांना फसवत पुढाऱ्यांच्या मागं अन पुढं फिरताना दिसत आहेत. यातून काही साध्य होत नाही, हे या मुलांना कोण सांगणार ?
शिक्षणाच्या अनेक संधी आहेत. त्या शोधून आपली आवड निश्चित केली पाहिजे. हवे तेच शिकले पाहिजे. पण आज लोक हे विसरले आहेत. प्रत्येकालाच आपला मुलगा डॉक्टर अन इंजिनियर पाहिजे आहे. मुलाच्या डोक्याला हे झेपतंय का ? त्याची आवड कशात आहे ? याचा मागोवा न घेता, विचार न करता, त्याच्यावर शिक्षण लादले जाते. कधी कधी मुलं याला वैतागतात आणि मग भरकटत जातात. याला खुद्द पालक जबाबदार असतात.
शिक्षणाचा दर्जा नौकरीची दारं उघडत असतो. ज्या दर्जाचं शिक्षण, त्याच प्रकारच्या नौकऱ्या मिळतात. त्यावेळी अभ्यास न करणारी आईतखावू मुलं हतबल होतात. नौकरी देणारी अनेक दारं असली तरी ती ठोठवायची त्यांची इच्छा होत नाही.
अनेक तरुण हे राजकारणी लोकांच्या नादी लागतात. त्यांना त्याचा उपयोग होत नसतो. पूर्वी राजकारण गुणवत्तेचं आणि समाजसेवेचा वसा घेतलेलं असायचं, पण आता तस राहील नाही. तिथं धंदा म्हणून ते करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. राजकारण आणि समाज कारण एकत्र करणारे लोक आता बोटावर मोजावी लागतात. तेथे सर्वच तरुणांना दिशा मिळण्याची संधी नसतेच. त्यामुळे जवळपास नव्वद टक्के तरुण पुढाऱ्यांच्या मागे पुढे करत स्वतःची वाट लावून घेतात. लोक त्यांना दिशा देण्याऐवजी मागेपुढे भरकवटत ठेवतात. मुले यातूनही आईतखावू होतात.
पूर्वी लहान लहान नौकऱ्या, धंदे करून लोक मोठे होत होते. आता तरुणांना मेहनत नको आहे. असे असेल तर ते कसे चालणार आज प्रत्येकाला थेट मोठी स्वप्न पडत आहेत.
आज ग्रामीण भागातून मुलाला शिक्षणासाठी शहरात पाठवले जाते. परिस्थिती नसताना पालक खर्च करतात. मग ज्या शाळा अन महाविद्यालयांनाच शिस्त नाही, तेथे ही मुलं प्रवेश घेतात. तेथे ना विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाते, ना गैरहजेरी पालकांना कळवली जाते. यातून नेमकं काय चाललं हे पालकांना कळत नाही. या मुलांना पुढच्या वर्गात ढकलून संस्था, शाळा चालते. अशाने विद्यार्थी आईतखावू होतो. अभ्यास करत नाही. हे देखील काम न करण्याचं एक कारण ठरतं.
एकीकडे धकाधकीच्या जीवनात पालकांना मुलाकडे पहायला वेळ नाही. त्यातच शिक्षणाची गंगोत्री मलीन झाली आहे. शिक्षणाचे पवित्र क्षेत्र धंदा होऊन बसले आहे. तर दुसरीकडे भरकटत चाललेले राजकारण तरुणांना बिघडवत आहे. असे झाले तर तयार होणारी आळशी पिढी देशाचं भविष्य उज्वल कसं करेल ? हा खरा प्रश्न आहे.
मुलं ग्रामीण भागातील असोत की शहरी, त्यांना ट्युशन लावणे गरजेचे वाटते. सध्या कोचिंग क्लासेसची चालती आहे. सुविधा नसताना भरमसाठ फीस घेतली जाते. कोणाला काय कळालंय, काय नाही, कोण काय करतोय, हे पहाणं तर दूरच. पण भल्या भल्या जाहिराती लावून पैसा उकळला जातो. यावर सरकारचे नियंत्रण नाही. मुलं इथंही फसतात. अभ्यास करत नाहीत, अन आळशी होतात.
हल्ली मुलांना चैन आणि सुख आयतं हवं असल्याचं दिसतं. मग हे तरुण काम काय करणार ? गुणवत्तेची स्पर्धा कोणा बरोबर करणार ? आळस कसा झटकणार ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. गुणवत्तापूर्ण शिक्षण ही काळाची गरज असली तरी आळशी मुलं यासाठी काय करतात, हा खरा चिंतनाचा विषय आहे.
काही तरुणांना राजकीय पद हवं असतं, तर काहींना गुत्तेदारी करायची असते. असे तरुण पुढाऱ्यांची दारं झिजवून पाच वर्षात दोन तीन लाखांचं काम मिळवतात. तोपर्यंत ती कर्जबाजारी झालेली असतात. एकदा का ही मुलं भरकटली की, ती ताळ्यावर येत नाहीत. वेळ निघून गेलेली असते. पश्चाताप करून काही होत नसते. आणि मग आयुष्य आईतखावू होत असतं.
स्वतःला आणि परिवाराला सुखी ठेवण्यासाठी तरुणांनी गुणवत्तेची कास धरावी. आजची सामाजीक स्थिती पाहिली तर समाजात शिकलेल्या मुलांपैकी दहा टक्के मुलांनाही नौकऱ्या लागत नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे जी मुलं मेहनत घेतील, तिच भविष्यात कोणतेही काम करू शकतील. त्यामुळे तरुणांनो, आळस झटका, वेळ निघून गेली की, अशा मुलांना जगणं मुश्किल होतं. असा प्रकार आपल्याबाबत घडू नये, यासाठी तरुणांनी प्रयत्न करावा, हीच तमाम पालकांची अपेक्षा आहे. त्यामुळे वेळेचे भान ठेवून विध्यार्थी दशेत अभ्यासाला महत्व देणे गरजेचे आहे.
-----------------
-----------------
अँड. अजित एम. देशमुख,
बीड.

Comments
Post a Comment