भक्तांच्या भावनांशी खेळू नका : त्या जागेवर मंदीर होणार ग्रामस्थाचा निर्धार
परळी : भक्तांच्या भावनांशी खेळू नका हा विषय अंधश्रद्धेचा नसून पुरातत्व विभागाने कोणतही भूमिका घेतली तरी या ठिकाणी मंदीर होणार असल्याचा निर्धार आता ग्रामस्थांनी व्यक्त केला आाहे. त्यामुळे आता या घटनेला वेगळे वळण मिळत आहे. बुधवारी सकाळी कन्हेरवाडी लगत आाढळून आलेल्या मूर्तीच्या ठिकाणी नाग आणून ठेवला असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे हे काही दैव चमत्कार नसून गावातीलच युवकांनी मूर्ती जवळ नाग ठेऊन नागरिकांची फसवणूक केली असल्याचे स्पष्ट दिसून येत होते. मात्र, हे सर्व घडवून आणले जात असून भक्तांची या ठिकाणी श्रद्ध असल्याने मंदिर होणारच असल्याचे डॉ. संतोष मुंडे यांनी सांगितले आहे. सध्या सदरील ठिकाणी सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम होत आहे. मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून परिसरात पूजेच्या साहित्य विक्रीचे दुकाने थाटण्यात आली आहेत. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये आता मंदीरावरून चकमक होत आहे. शिवाय ही मूर्ती भगवान विष्णूची असल्याचे म्हणने ग्रामस्थांचे आहे तर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्ती सुर्य भगवानची असल्याचे सांगितले आहे. हा काही श्रंद्धेचा बाजार नसून इन कॅमेरा पुरातत्व विभागाने खोदकाम करण्याची मागणी विष्णू फड, राजेश फड, महेंश मुंडे, ह.भ.प. गोविंद महराज मुंडे यांनी केली आहे.

Comments
Post a Comment