लग्न ठरत नसल्याने तरुणाची आत्महत्या


लग्न ठरत नसल्याने तरुणाची आत्महत्या

सातारा: हल्ली कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली जाईल याचा काहीही नेम नाही. साताऱ्यात एका तरुणाने लग्न ठरत नसल्यामुळे आयुष्य संपवलं.

नितीन शेंडगे असं या 28 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो वाई तालुक्यातील बदेवाडी गावातील रहिवासी होता.

नितीनने आज सकाळी लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला.

नितीन गेल्या अनेक दिवसांपासून लग्नासाठी मुली पाहात होता. मात्र त्याचं लग्न जुळत नव्हतं. त्याच नैराश्यातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

या घटनेची नोंद भुईज पोलीस ठाण्यात झाली आहे.

दरम्यान, एकीकडे साताऱ्यात लग्न ठरत नसल्याने तरुणाने आत्महत्या केली आहे, तर दुसरीकडे केरळमध्ये लग्नासाठी सुयोग्य मुलगा मिळावा म्हणून एका तरुणीने फेसबुक पोस्ट लिहिली आहे. ही फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

Comments