पती व सासूच्या छंळाला कंटाळून महीलेने घेतले पेटवून
माजलगाव :दोन महिन्याची गर्भवती असणाऱ्या महिलेस तिच्या पतीने आणि सासूने गर्भपात करण्यासाठी सातत्याने छळ केल्याने हताश झालेल्या महिलेने अखेर स्वतःस पेटवून घेतल्याची घटना माजलगाव तालुक्यातील तेलगाव येथे घडली. या घटनेत हि महिला ९५ टक्के भाजली असून तिच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पूजा मनोहर निवळे (वय ३४) असे पिडीत महिलेचे नाव आहे. तिचा पहिला पती मरण पावल्यानंतर १५ वर्षापूर्वी तिचे दुसरे लग्न मनोहर केरबा निवळे (रा. तेलगाव, ता. माजलगाव) याच्यासोबत झाले. मनोहरचेही हे दुसरे लग्न होते. त्याची पहिल्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे. मनोहरला पहिल्या पत्नीपासून दोन मुले तर पुजापासून एक मुलगा झाला. सध्या पूजा दोन महिन्यांची गर्भवती आहे. परंतु, आधीचे तीन मुले असल्याने पती मनोहर आणि सासू पार्वती या दोघांनी गर्भपात कर म्हणून पुजाकडे तगादा लावला होता आणि त्यासाठी त्रास देत होते. सततच्या त्रासाला कंटाळून पूजाने दि. १६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घराची कडी आतून लावून घेतली आणि रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. अचानक मोठा जाळ झाल्याचे दिसल्याने मनोहरने पळत येऊन पूजाला विझविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात मनोहर देखील भाजला आहे. गंभीर भाजलेल्या पूजाला तिच्या भावाने आणि चुलत्याने आधी माजलगावच्या शासकीय रुग्णालयात आणि नंतर बीएड येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असे पूजाने जबाबात सांगितल आहे. ९५ टक्के भाजलेल्या पुजाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. याप्रकरणी पूजाचा पती आणि सासूवर कलम ४९४-अ, ३४ अन्वये माजलगाव ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Post a Comment