विद्यार्थ्यांनो, शिक्षणाबरोबरच भ्रष्टाचार निर्मूलनाकडे लक्ष द्या- अँड. अजित देशमुख

विद्यार्थ्यांनो, शिक्षणाबरोबरच भ्रष्टाचार निर्मूलनाकडे लक्ष द्या- अँड. अजित देशमुख

            बीड ( प्रतिनिधी ) आयटीआय मधील विद्यार्थी भाग्यवान आहेत. शिक्षण संपलं की, त्यांच्यासाठी नौकऱ्या तयार असतात. अन्य क्षेत्रात फार मोठी स्पर्धा आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या वेळी पूर्ण लक्ष केंद्रित करून अभ्यास करावा. आपल्या परिवारातील लोक प्रतिकूल परिस्थितीत शिकायला पाठवतात, ही बाब लक्षात ठेवावी. मात्र आता विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच भ्रष्टाचार निर्मूलनाकडे लक्ष दयावे, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी व्यक्त केले.
           शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, बीड येथील विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात मार्गदर्शन करता ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, एक एक कार्यकर्ता गावात तयार झाला आणि त्याने माहिती अधिकार वापरला तर तो गावाला वळण लावू शकतो. आपलं तर पहायलाच हवं पण त्याबरोबरच आता समाजकडेही पहायला हवं. जिल्ह्यात राष्ट्रपती पुरस्कारही जर बोगस येत असतील तर ही बाब लाजिरवाणी आहे. युवकांची चळवळच हे रोखू शकेल, असेही ते म्हणाले.
            सुप्रसिद्ध व्याख्यानकार प्रा. बाळासाहेब मस्के यांनी समाजात आता मोठ्या प्रमाणात लोकजागृतीची गरज असल्याचे नमूद करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील समाज व्यवस्था आणि आताच समाज याबाबत विचार मांडले.
          अँड. संगीता धसे यांनीही प्रभावीपणे आपले विचार मांडले. शिक्षणाच्या प्रवाहात असताना मुलींनी दक्ष असायला हवे. विद्यार्थी दशेत जागरूकते बरोबरच अभ्यासाला महत्व देण्याचे सांगत त्यांनी भरकटलेल्या मुलांना आता कायदा सक्षम झाल्याचे सांगितले. त्यांच्या भाषणाने कायदेविषयक जन जागरण चांगले झाले.
             यावेळी गोवर्धन मस्के सर, पत्रकार शेख तय्यब यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयटीआय कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष चिपाडे सर हे होते. त्यांनीही समयोचित भाषण केले.
             कार्यक्रमाचे संचलन शिंदे सर यांनी केले. तर आभार माने सर यांनी मानले. कार्यक्रमास रायते सर, क्षीरसागर सर, आर. टी. माने, एन. एन. शिंदे, राठोड सर, बाळासाहेब जाधव, कानडे सर, पवन रामदासी, बागडे मॅडम, डुमने मॅडम, हे हजर होत. विध्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात होती.

Comments