कै. मुंडे यांच्या अधुऱ्या स्वप्नांची पूर्तता विकासाच्या माध्यमातून त्या दोघीही करतील. :-गडकरी
अंबाजोगाई : कै. गोपीनाथराव मुंडे यांनी राज्याच्या विकासाला दिशा दिली. ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असतांना त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केले. आज ते नाहीत. हे दु:ख मनाला हेलावून टाकते. सहकारातही मी मुंडेंच्या प्रेरणेतूनच आज तीन साखर कारखान्यांची निर्मिती केली. ते असतांना बीड जिल्ह्यात येण्याची संधी अनेकदा मिळाली. मात्र, त्यांच्या स्मृति आम्हाला कायम शक्ती देत राहतील. कै. मुंडे यांच्या कार्याचा वारसा त्यांच्या कन्या पंकजा व प्रितम या चांगल्या कामाच्या माध्यमातून जोपासत आहेत. कै. मुंडे यांच्या अधुऱ्या स्वप्नांची पूर्तता विकासाच्या माध्यमातून त्या दोघीही करतील. अशा सद्गदीत भावना गडकरी यांनी आपल्या भाषणाच्या प्रारंभी व्यक्त केल्या. राज्य सरकार आणि केंद्रसरकारच्या धोरणामुळे रस्ते, वीज, पाणी व सिंचन या योजनांची परिपूर्ती होत असल्याने गाव समृद्ध व संपन्न होत आहे. महानगरातील लोकांना ग्रामीण भागाच्या विकासाचा हेवा वाटावा अशा पद्धतीचा विकास केंद्र व राज्य शासन यांनी करून दाखविला. भविष्यात महाराष्ट्र बदलेला दिसेल. यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कटीबद्ध आहे. असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथे भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधीकरण व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या वतीने बीड जिल्ह्यात होत असलेल्या ६ हजार ४२ कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून नितीन गडकरी बोलत होते. यावेळी व्यासपिठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खा. डॉ. प्रितम मुंडे, लातूरचे खा. सुनिल गायकवाड, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. आर. टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे, आ. लक्ष्मण पवार, आ. प्रा. संगिता ठोंबरे, आ. सुधाकर भालेराव, बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार,माजी आ. गोविंद केंद्रे, माजी आ. केशवराव आंधळे, गणेशराव हाके, अंबासाखरचे अध्यक्ष रमेशराव आडसकर, फुलचंद कराड, गयाबाई कराड, बीड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष रमेश पोकळे, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार उपस्थित होते. यावेळी बोलतांना नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वात जास्त निधी केंद्र शासनाने बीड जिल्ह्यासाठी दिला आहे. १० हजार कोटी रुपये रस्त्यांच्या कामासाठी मंजूर करण्यात आले आहेत. ६ हजार कोटींची कामे सुरू झाली तर उर्वरित रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात येईल व ती कामे चार महिन्यात सुरू करून बीड जिल्ह्याचा चेहरा बदलून टाकला जाईल. केंद्र शासनाच्या मदतीने महाराष्ट्रात अनेक दर्जेदार उपक्रम राबविण्यात येणार आहेत. अर्धवट राहिलेली धरणे पूर्ण करण्यासाठी ८४५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल तर नाबार्डचे कर्ज १७३९.५० कोटी दिले जाईल. ग्रामीण भागात सर्वांगिण विकास साध्य करून गावे समृद्ध व संपन्न करण्याचा ध्यास केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे. साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकºयांच्या जीवनात आर्थिक क्रांती निर्माण करण्यासाठी इथेनॉलला प्राधान्य दिले जाणार आहे. पेट्रोल, डिझेलच्या ऐवजी इथेनॉलचा वापर मोठ्या प्रमाणात होईल. इथेनॉलवर चालणारी वाहने निर्माण झाली आहेत व भविष्यात ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार वसल्याचे सांगितले.
साडेतीन वर्षात १५ हजार कि.मी. रस्ते - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रातील भाजप सरकारने साडेतीन वर्षात १५ हजार कि.मी. चे रस्ते महाराष्ट्रात केले. तर गेल्या ६७ वर्षात केवळ ५ हजार कि. मी. चे काम झाले होते. विकासाची प्रक्रिया गतिमान झाली आहे. याची प्रचिती विकासकामाच्या माध्यमातून जनतेच्या समोर ठेवण्यात आली. आगामी काळातही अनेक क्रांतीकारी योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला विकासाच्या शिखराकडे नेण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बीड जिल्हा विकासाच्या मार्गावर आणला - पंकजा मुंडे
केंद्रातील भाजप सरकारने साडेतीन वर्षात १५ हजार कि.मी. चे रस्ते महाराष्ट्रात केले. तर गेल्या ६७ वर्षात केवळ ५ हजार कि. मी. चे काम झाले होते. विकासाची प्रक्रिया गतिमान झाली आहे. याची प्रचिती विकासकामाच्या माध्यमातून जनतेच्या समोर ठेवण्यात आली. आगामी काळातही अनेक क्रांतीकारी योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला विकासाच्या शिखराकडे नेण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बीड जिल्हा विकासाच्या मार्गावर आणला - पंकजा मुंडे
बीड जिल्हा विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी विविध योजना राबवून जिल्ह्याचा सर्वांगिण विकास साध्य केला जाईल. अशी ग्वाही बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, नितीन गडकरी यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी ८ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. केवळ साध्या एका पत्रावर गडकरी यांनी हा निधी उपलब्ध करून दिला. आगामी काळातही त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठी कामे होतील. त्यांनी दिलेल्या या निधीबद्दल पंकजा मुंडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बोलतांना पंकजा म्हणाल्या की, कै. गोपीनाथ मुंडे यांची वारसदार म्हणून मी राजकारणात आले. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काम करीत राहणार आहे. राजकारणात काम करतांना अनेक संकटे आली पण त्यावर मात करीत काम करीत राहिले. आज बीड जिल्ह्याच्या विकासाला एक वेगळी दिशा मिळाली आहे. बेरजेचे राजकारण करीत विकास हाच जनतेचा हक्क या उद्देशाने मी काम करीत राहणार. सत्ता हे साधन लोकांच्या विकासासाठी वापरणार, ऊसतोड मजुरांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तके कसे येईल. ही मुंडे साहेबांची स्वप्नपूर्ती साकार करण्यासाठी आपण काम करीत आहोत. असे सांगून आपल्या खात्याच्या माध्यमातून झालेल्या विविध योजनांची व कामांची माहिती त्यांनी दिली. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार यांनी केले. संचलन रमेश पोकळे यांनी तर उपस्थितांचे आभार आ. संगिता ठोंबरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महिला व नागरिक भर उन्हातही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment